नगरदेवळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी

(प्रतिनिधी/हसीबुर शेख ✍️)नगरदेवळे- दि ३१ जानेवारी २०२६ येथील सुतार लोहार समाज मंडळाच्या वतीने आज सकाळी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त भगवान विश्वकर्मा मंदिरात महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक मिळवलेल्या गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांचा समाज मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रा उमेश काटकर सर व प्रा एस एच जोशी सर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रा आर एच भागवत सर यांचा देखील शाल श्रीफळ देऊन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामशिक्षण समितीचे संचालक आप्पासाहेब जगन्नाथ गबा पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरदार एस के पवार विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री एस पी बावस्कर होते. या प्रसंगी श्री बावस्कर सर यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या विषयी माहिती सांगतांना प्राचीन भारतीय स्थापत्य कलेत विश्वकर्मा यांच्या कारागिरांनी केलेल्या अत्युच्च कला कौशल्याचा परिचय करून दिला.

.प्रा जोशी सर यांनी कला उत्सवातील विद्यार्थ्यांचे अनमोल योगदान याविषयी गौरवोद्गार काढले तर प्रा उमेश काटकर यांनी कला उत्सव स्पर्धेची विस्तृत माहिती देत भविष्यात या विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

+

.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री दीपक रमेश हिरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व सुतार व लोहार समाज बांधव तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व अन्य समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी भगवान विश्वकर्मा यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सर्व समाज बांधव सहभागी झाले होते.

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment