पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):– नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पाचोरा येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उमेदवाराचे अभिनंदन करूनContinue reading “पाचोरा येथे भाजप-महायुतीचा निर्धार: जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला मान्यवरांचे बळ; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून शुभेच्छा”
Category Archives: News
देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
देशसेवेसाठी आयुष्यातील तब्बल 23 वर्षे समर्पित करणारे सार्वे गावाचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभर विविध ठिकाणी सेवा बजावतांना त्यांनी शांतीदूत म्हणून इस्राईल व सिरीया येथेही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यासाठी सार्वे गावासह परिसरातील नागरिकContinue reading “देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न”
वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:
संपादक हसीबुर शेख ✍️ :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा व होळ येथील दिनांक ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ गाव होळ शिवारातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत, पाचोरा तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवार, २ जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामेContinue reading “वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:”
पाचोरा परिवहन विभागातील कर्मचारी राजू चौधरी सेवानिवृत्त; ३४ वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव
प्रतिनिधी/पाचोरा :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- परिवहन विभाग पाचोरा येथील कर्मचारी राजू शेषराव चौधरी हे वयोमानानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण करून ३१मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी परिवहन विभागात तब्बल ३४ वर्षे अविरत आणि यशस्वी सेवा बजावली. त्यांच्या या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळContinue reading “पाचोरा परिवहन विभागातील कर्मचारी राजू चौधरी सेवानिवृत्त; ३४ वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव”
नगरदेवळा होळ शिवारात निसर्गाचा कोप वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा परिसरातील होळ शिवारात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अवकाळी संकटामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान:-वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, उभीContinue reading “नगरदेवळा होळ शिवारात निसर्गाचा कोप वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान”
नगरदेवळा: वादळी वाऱ्यासह पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा येथील होळ शिवारात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. येथील शेतकरी अफजल खान फत्ते खान यांच्या शेतात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे ऐन काढणीला आलेल्या केळीच्या बागेचे होत्याचे नव्हते झाल्याने अफजल खान यांच्यावर मोठे संकट ओढवलेContinue reading “नगरदेवळा: वादळी वाऱ्यासह पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान”
नगरदेवळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा दणका: मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव
संपादक हसीबुर शेख ✍️:- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा (३१ मे २०२६): जून महिन्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, आज ३१ मे रोजी नगरदेवळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसासोबतच काही भागांत गाराही पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उ दुपारनंतर आकाशात ढगांचीContinue reading “नगरदेवळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा दणका: मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव”
नगरदेवळा वासीयांसाठी आनंदाची बातमी: २.५ कोटींच्या निधीतून पूल नूतनीकरण व ४ किमी रस्त्याचे होणार डांबरीकरण
संपादक हसीबुर शेख ✍️ :-नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:- नगरदेवळा परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गडद नदीवरील पुलाचे नूतनीकरण आणि नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशनपर्यंतच्या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरी करणासाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणारContinue reading “नगरदेवळा वासीयांसाठी आनंदाची बातमी: २.५ कोटींच्या निधीतून पूल नूतनीकरण व ४ किमी रस्त्याचे होणार डांबरीकरण”
नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित
संपादक हसीबुर शेख ✍️ :- नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :- नगरदेवळा: पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत नगरदेवळा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्र समूहातर्फे प्रतिष्ठेच्या ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. शौर्य आणि कर्तव्यदक्षतेचाContinue reading “नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित”
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा ‘वज्रघात’! ३ दिवसांत ३३ अटकेसह २७ आस्थापनांना टाळे
(संपादक हसीबुर शेख):- ✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- महाराष्ट्र राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच, आपल्या धडाकेबाज कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भ्रष्ट आणि बेजबाबदार व्यावसायिकांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही,” असा सज्जड इशारा देत, केवळ ३ दिवसांच्या कालावधीत राज्यभरात धडक कारवाई करतContinue reading “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा ‘वज्रघात’! ३ दिवसांत ३३ अटकेसह २७ आस्थापनांना टाळे”