(संपादक हसीबुर शेख ✍️): (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर सर मा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे सर तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. योगेश पाटील सर डॉ. हर्षदा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आज रोजीContinue reading “नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा”
Category Archives: News
कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कसोदा ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महत्त्वाचे टप्पे आणि सद्यस्थितीकसोदा शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केलीContinue reading “कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात”
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे ; महेश्वर रेड्डींची पुण्यात बदली
संपादक हसीबुर शेख ✍️: (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज): महाराष्ट्र राज्य गृह विभागाने आज पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यातContinue reading “जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे ; महेश्वर रेड्डींची पुण्यात बदली”
नगरदेवळा येथे रंगला कुस्तीचा थरार; क्रीडा व कला क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
नगरदेवळा प्रतिनिधी शेख आहेतेशम रजा:✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह) नगरदेवळा येथे महात्मा फुले भाग्य केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने केवळ कुस्तीचाच आखाडा रंगला नाही, तर शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या गुणवंतांचा यथोचित सन्मान करून आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.गुणवंतांचा सन्मान सोहळाआयोजक ज्योतिराम महाजन व त्यांचे मित्र मंडळContinue reading “नगरदेवळा येथे रंगला कुस्तीचा थरार; क्रीडा व कला क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव”
भडगाव हादरले! खुशाल आप्पा नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या
संपादक हसीबुर शेख ✍️ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज): भडगाव शहरातील खुशाल आप्पा नगर परिसरात शनिवारी दुपारी एका भीषण घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. येथील २२ वर्षीय तरुण स्वप्नील प्रवीण शिंपी याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली असून, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातContinue reading “भडगाव हादरले! खुशाल आप्पा नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या”
नगरदेवळा दिगर विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिके’ला सदिच्छा भेट
(संपादक हसीबुर शेख ✍️):. नगरदेवळा येथील शिवकन्या बहुउद्देशीय संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेला आज नगरदेवळा दिगर विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. अभ्यासिकेच्या शैक्षणिक कार्याची पाहणी करून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित मान्यवरया प्रसंगी नगरदेवळा दिगर विकास सोसायटीचे चेअरमन शैलेंद्र परदेशी (मुन्ना काका), सोसायटीचे संचालक रावसाहेब पाटील, कर्मचारी आप्पासाहेब भारत काळे,Continue reading “नगरदेवळा दिगर विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिके’ला सदिच्छा भेट”
प्रशासकीय सेवेतील ‘जनमाणसाचे’ तहसीलदार: पाचोरा तहसीलचे विजय बनसोडे यांचा आगळावेगळा ठसा
संपादक हसीबुर शेख ✍️: पाचोरा: सरकारी कार्यालयात अनेक अधिकारी येतात आणि बदली होऊन जातात, पण काही अधिकारी आपल्या कामातून आणि स्वभावातून जनतेच्या मनात कायमचे घर करतात. असाच अनुभव सध्या पाचोरा येथील तहसील कार्यालयात येत आहे. पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि सर्वसमावेशक भूमिकेने तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्तव्यदक्षता आणि सहकार्याचीContinue reading “प्रशासकीय सेवेतील ‘जनमाणसाचे’ तहसीलदार: पाचोरा तहसीलचे विजय बनसोडे यांचा आगळावेगळा ठसा”
खाकी वर्दीतलं ‘माणुसकीचं’ देखणं रूप: पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार – जनसामान्यांच्या मनातील ‘राजा’
(संपादक हसीबुर शेख ✍️:) पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कडक शिस्त आणि दरारा. मात्र, याच खाकी वर्दीमध्ये एक हळवं आणि मदतीचं हृदय जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार. आपल्या कर्तव्यात ‘दबंग’ असलेल्या या अधिकाऱ्याने आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि मदतीच्या वृत्तीने संपूर्ण तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माणContinue reading “खाकी वर्दीतलं ‘माणुसकीचं’ देखणं रूप: पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार – जनसामान्यांच्या मनातील ‘राजा’”
बाळद बुद्रुकच्या शिरपेचात मानाचा तुरा; आदिल शरीफ शेख यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती
संपादक हसीबुर शेख ✍️: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतात, हे बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील सुपुत्र आदिल शरीफ शेख यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आदिल यांची मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशाचा प्रवास आदिलContinue reading “बाळद बुद्रुकच्या शिरपेचात मानाचा तुरा; आदिल शरीफ शेख यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती”
भक्तीचा मळा फुलला! मोरया मेन्स वेअरच्या संचालकांनी स्वीकारली वारकरी संप्रदायाची दीक्षा
नगरदेवळा (संपादक हसीबुर शेख ✍️: “तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । ह्रदयी कळवळा वैष्णवाचा ॥” या उक्तीप्रमाणे आज दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक चैतन्याच्या वातावरणात ‘मोरया मेन्स वेअर’ परिवारातील सदस्यांनी वारकरी संप्रदायाची अधिकृत दीक्षा घेऊन गळ्यात तुळशीची माळ परिधान केली. मुख्य सोहळा आणि उपस्थिती आदरणीय पीएसआय योगेश गणगे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हाContinue reading “भक्तीचा मळा फुलला! मोरया मेन्स वेअरच्या संचालकांनी स्वीकारली वारकरी संप्रदायाची दीक्षा”