सावधान! मालेगावच्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’मुळे चेहऱ्यावर गंभीर दुष्परिणाम; ग्राहकांमध्ये संतापाची लाट

मालेगाव:- (विशेष /प्रतिनिधी ):-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

सध्या बाजारात सौंदर्याची खात्री देणाऱ्या अनेक क्रीम्सची मोठी जाहिरात केली जात आहे. मात्र, मालेगाव येथे उत्पादित होणाऱ्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’ (Alpha Beauty Cream) मुळे अनेक ग्राहकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर जबरदस्त साईड इफेक्ट होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नेमका प्रकार काय:-

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेपणाचा आणि डाग विरहित त्वचेचा दावा करणाऱ्या या क्रीमचा वापर केल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडणे, त्वचा जळजळणे, लालसरपणा येणे आणि खाज सुटणे असे प्रकार घडत आहेत. काही दिवसांच्या वापरानंतर चेहरा उजळण्याऐवजी अधिकच खराब होत असल्याचा अनुभव त्रस्त ग्राहकांनी मांडला आहे.

तज्ज्ञांचा इशार:-

त्वचारोग तज्ज्ञाच्या मते, अशा स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या क्रीम्समध्ये अनेकदा स्टेरॉइड्स किंवा घातक रसायनांचा अतिवापर केलेला असतो. यामुळे सुरुवातीला त्वचा उजळल्यासारखी वाटते, मात्र कालांतराने त्वचेचा नैसर्गिक पोत खराब होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.

ग्राहकांचे आवाहन:-

ज्या ग्राहकांनी ही क्रीम वापरली आहे, त्यांनी तातडीने वापर थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच, संबंधित प्रशासनाने आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या उत्पादनाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.”सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना ती अधिकृत आहेत का आणि त्यांचे घटक काय आहेत, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. जाहिरातीला बळी पडून स्वतःच्या आरोग्याशी खेळ करू नका.”

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment