संपादक हसीबुर शेख ✍️ :-
(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ):-
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि गतिमान कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा बुद्रुक येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील यांना अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र राज्य समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी शिर्डी येथील प्रसिद्ध ‘हॉटेल 9 Coin’ च्या सभागृहात संपन्न झाला.लोकसेवेची पावती: सन्मान इंद्रनिल पाटील यांचा!श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील यांनी नगरदेवळा बुद्रुक व परिसर क्षेत्रात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे, गरजूंची मदत करणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रभागी राहून काम केले आहे. त्यांच्या याच निःस्वार्थी आणि अविरत लोकसेवेची दखल घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना हा राज्यस्तरीय बहुमान प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रविंद्र रा. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (प्रतिष्ठान अतिरिक्त नोंदणी क्रमांक: Reg. No. महाराष्ट्र / ९९१ | ISBN NO. 978-93-95 318-17-4).
वारसा पुढे नेण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव:-
इंद्रनिल पाटील यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच पाचोरा तालुका आणि नगरदेवळा परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्या सामाजिक कार्याचा हा गौरव असून, भविष्यातही जनतेची सेवा करण्याचा वारसा असाच पुढे सुरू राहो,” अशा शब्दांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रविंद्र गुंजाळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, मला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्या नगरदेवळा ग्रामस्थांचा आहे. या सन्मानामुळे समाजकार्याची जबाबदारी आणखी वाढली असून, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल.”— श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील (पुरस्कार विजेते)
सध्या सोशल मीडियासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून श्री. इंद्रनिल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.