पिंपळगाव हरेश्वर येथील जि.प. उर्दू शाळेत उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) : प्रतिनिधी
दर्पण मराठी लाईव्ह न्युज

देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत अत्यंत देशभक्तीच्या आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ध्वजारोहण व मनोगत
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. शाळेचे एसएमसी (SMC) अध्यक्ष तालिब कुतुबोद्दीन शेख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर शाळेत विविध आकर्षक सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रम पार पडले, ज्यांना उपस्थित नागरिकांची विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, शाळेचे मुख्याध्यापक हाफिज वसीम खान सर आणि एसएमसी अध्यक्ष तालिब शेख यांनी आपले मनोगत (इजहारे ख्याल) व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामस्थ व पालकांचा विशेष सत्कार व आभार
या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पिंपळगाव येथील तरुण वर्ग आणि पालकांनी मुलांस रोख बक्षिसे (नगद इनामत) प्रदान केली.

मुलांच्या या हौसला अफजाईबद्दल शाळेची शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकवृंदाच्या वतीने पिंपळगावचे समस्त तरुण व पालकवर्गाचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सहकार्य करणाऱ्या समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंदाचेही आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment