जि. प. उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पिंपळगाव हरेश्वर, प्रतिनिधी:-

दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

जि. प. उर्दू शाळा, पिंपळगाव हरेश्वर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आला. शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवित वृक्षांच्या संगोपनाचा संकल्प केला.
या वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व रोपे शाळेचे पदवीधर शिक्षक मा. अब्दुल करीम सर यांनी स्वखर्चाने भेट म्हणून दिली. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल शाळा समिती अध्यक्ष व सदस्य व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्यावतीने त्यांचा मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करून वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची नियमित देखभाल व संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली.
या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवाईने नटण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच सहभागी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment