नगरदेवळ्यात रमजानमध्ये रोजेदारांसाठी ‘अभिलाषा रोकडे यांच्या सेवाभावी उपक्रम

  • पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांच्या वतीने उपवास करणाऱ्या रोजेदारांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रमजानचे संपूर्ण 1 दिवस रोजा (उपवास) ठेवणाऱ्या नागरिकांना रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) वेगवेगळ्या आवश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांचा कडून देण्यात आली आहे.
  • या उपक्रमात उपस्थित सलीम शाह, अनिस खाटीक, अदनान रजा, खालील खान, नजीम खाटीक, आदी कार्यकर्त्यांचा पुढाकार असून सामाजिक बांधिलकीतून आणि सेवाभावनेतून हा उपक्रम राबविन्यात आले आहे. रमजान हा संयम, त्याग, दानधर्म आणि बंधुभावाचा महिना असल्याने समाजातील गरजू उपवासकर्त्यांना दिलासा मिळावा, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.इफ्तारसाठी, खरबूज, चिकू,खजूर, पाणी, फळे, आवश्यक खाद्यपदार्थ तसेच गरजेनुसार इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांनाही रोजा सोडतांना अडचण भासणार नाही.
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे सांगितले की, हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजात आपुलकी, माणुसकी आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. रमजानच्या निमित्ताने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.या उपक्रमाबद्दल नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे. रमजान महिन्यात गरजू रोजेदारांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment