हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.शेतकरी बांधवांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच नदी नाल्याच्या खोऱ्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळाव असं सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याचे अंदाजानुसार जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता