(संपादक हसीबुर शेख ✍️:)
पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कडक शिस्त आणि दरारा. मात्र, याच खाकी वर्दीमध्ये एक हळवं आणि मदतीचं हृदय जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार. आपल्या कर्तव्यात ‘दबंग’ असलेल्या या अधिकाऱ्याने आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि मदतीच्या वृत्तीने संपूर्ण तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
हसमुख व्यक्तिमत्व आणि ‘दबंग’ कार्यशैली
राहुल कुमार पवार यांची कार्यपद्धती ही शिस्तबद्ध असली तरी, सर्वसामान्यांसाठी मात्र ते नेहमीच ‘हसमुख’ आणि ‘सहकार्य’ करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेतात. गुन्हेगारांसाठी ‘दबंग’ असलेले पवार साहेब सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र नेहमीच आधारवड ठरले आहेत.
लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर
केवळ गुन्हेगारी नियंत्रणच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही ते आघाडीवर असतात. संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाणे, गरिबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर त्वरित मार्ग काढणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या याच “मनाचे राजा” असलेल्या स्वभावामुळे पाचोरा तालुक्यातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदराची आणि प्रेमाची भावना आहे.
सर्वसमावेशक वागणूक
” पोलीस हा जनतेचा मित्र आहे,” हे वाक्य राहुल कुमार पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाशी चांगली वागणूक ठेवल्यामुळे आज ते खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील लोकप्रतिनिधीप्रमाणे लोकप्रिय झाले आहेत.
“पोलीस दलात काम करताना लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असते. राहुल कुमार पवार साहेब यांनी आपल्या कार्यातून तो विश्वास मिळवला आहे.” —