संपादक हसीबुर शेख ✍️:
(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):
महाराष्ट्र राज्य गृह विभागाने आज पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकांत धिवरे यांची धुळे येथून जळगावला बदली तर महेश्वर रेड्डी यांची जळगाव येथून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तसेच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे, तर निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रशासकीय कारणास्तव या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी जारी केले आहेत. जळगाव जिल्ह्याचा कार्यभार श्रीकांत धिवरे लवकरच स्वीकारतील अशी शक्यता आहे.