प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली

माझी प्रगती न्यूज (संपादक)

हसीबुर शेख नगरदेवळा

पाचोरा: नगरपरिषद प्रभाग क्र. ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध समस्या, शाळांच्या मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ तसेच शिक्षक व पालकांशी समन्वय साधत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल पाचोरा शहरातील नागरिक, सहकारी नगरसेवक, शिक्षकवर्ग तसेच समर्थकांकडून आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत

संपादक:.हसीबुर शेख नगरदेवळा

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment