मतदार यादी शुद्धीकरणाची रणधुमाळी नगरदेवळा गावात SIR मोहिम प्रारंभ

लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मतदार यादीला अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची रणधुमाळी सुरू केली आहे. या व्यापक मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून पाचोरा विधानसभा मतदारसंघात Person To Person Mapping आणि Progeny Mapping या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतील नावे सन २००२ च्या मतदार यादीशी जुळवून पाहिली जाणार असून, ज्या मतदारांची नावे त्या यादीत थेट आढळत नाहीत, त्यांची रक्त-नातेसंबंधाच्या आधारे नोंदणी पडताळली जाणार आहे.

यामुळे बोगस, दुबार किंवा अयोग्य नोंदी हद्दपार होऊन मतदार यादी अधिक शुद्ध व सक्षम होणार आहे.या प्रक्रियेचा भाग म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) मतदारांच्या घरोघरी भेटी देत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संशय न बाळगता B.L.O. अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी केले आहे.लोकशाही मजबूत करायची असेल, तर मतदार यादी निर्दोष असलीच पाहिजे—या भूमिकेतून राबवली जाणारी ही मोहीम पाचोऱ्यात लोकसहभागाच्या जोरावर यशस्वी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(संपादक हसीबुर शेख नगरदेवळा ✍️)

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment