पत्रकार शाह जावेद बशीर यांचा विशेष गौरवनगरदेवळा (प्रतिनिधी):-जावेद शाह नगरदेवळा येथे शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन आणि रमजान ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘शिरखुर्मा’चा आस्वाद घेतला, ज्यामुळे शहरात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती:-
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार एस. के. पवार हायस्कूलचे प्राध्यापक उमेश काटकर सर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते निवृत्ती मोरे साहेब (सहाय्यक पोलीस फौजदार) हाजी अब्दुल गणी शेठ, कुडे आबा, वीरेंद्र भांडारकर, पिंटू भामरे, अभिलाषाताई रोकडे, पत्रकारितेचा गौरव:
शाह जावेद बशीर यांचा सत्कार:- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाह जावेद बशीर यांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’चे संपादक फारूक शाह नौमानी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार प्रदान करण्यात आला.तसेच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना (भडगाव) आणि साई टीव्हीएस (चाळीसगाव, येवला, कोपरगाव) चे संचालक वीरेंद्र अशोक भांडारकर, माजी उपसरपंच पिंटू भामरे, आदित्य परदेशी (आदित्य फाउंडेशन) यांच्यातर्फेही शाह जावेद बशीर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.वृत्त प्रभात’ विशेषांकाचे प्रकाशन:- वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘वृत्त प्रभात विशेषांकाचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अंकात सामाजिक आणि प्रादेशिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पत्रकार आणि पोलीस बांधवांची उपस्थिती:- या सोहळ्याला पत्रकार आणि पोलीस प्रशासनातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होतीस्थानिक पत्रकार:- वरिष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, मिलिंद दुसाने, शैलेंद्र बिरारी, अली रजा खान, फारुख शेख, सोनू परदेशी, फिरोज पिंजारी, हशीबुर शेख.भडगाव-कजगाव पत्रकार संघ:- भानुदास हिलाल महाजन (जिल्हाध्यक्ष), नितीन सोनार, मांगीलाल मोरे, निलेश महाले, डॉ. बी. बी. भोसले, यश कुमार, हर्षल चौधरी.वृत्त प्रभात टीम:- संपादक फारुख शाह नौमानी,सय्यद कुदबुद्दीन, आमिन शाह, अय्युब शेख, जुबेर मणियार.पोलीस प्रशासन:- पोलीस कॉन्स्टेबल मजिद पठान, वैभव पाटील.राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर:-कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरांतील मान्यवर उपस्थित होते,
ज्यात प्रामुख्याने: नूर चेअरमन, सागर पाटील, बशीर शाह, रोशन जाधव सर, डॉ. युवराज गढरी, सादिक बागवान, आसिफ रजा खान, मेंबर सुनील महाजन, अशोक सान्नी, सोनू नाना, उमर रजा टेलर, इश्तियाक बेग, मोसिन बेग, सद्दाम शाह, राजेंद्र भांडारकर, कोकंणदे सर, पी. एम. पाटील सर, रोकडे सर, जाकीर सर, कन्हैया सिंग परदेशी, सुनील शिरोडे, शेर शाह, छोटू लोहार, शकील बागवान, गणेश देशमुख, मुदस्सर शेख, शेर खान, अजय शिरुडे, कडू पाटील, जब्बू शेख, अन्वर शेख.सामाजिक एकोप्याचा संदेश:- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘शिरखुर्मा’ पार्टीने आणि वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाने नगरदेवळा शहरातील सर्वधर्मीय बांधवांना एकत्र आणले. पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या व्यापारी व राजकीय वर्गाने कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार, फारुख शाह यांनी मानले