निर्भीड व सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे युवा पत्रकार फिरोज पिंजारी यांना जाहीर झालेला ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ हा सन्मान 9 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे उत्साहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला.मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फिरोज पिंजारी यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- 18 वर्षांच्या धाडसी पत्रकारितेचा गौरव :- फिरोज पिंजारी यांनी गेल्या 18 वर्षांत निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- त्यांनी विविध वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, तसेच पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखन व आंदोलन केले आहे.विविध जबाबदाऱ्यांमधून सक्रिय कार्य :-
- सध्या ते दै. कोकण प्रदेश न्यूज, दै. कोकण प्रजा तसेच विविध न्यूज पोर्टलचे संपादक म्हणून कार्यरत असून न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) चे संस्थापक अध्यक्ष आहेत.
- तसेच विविध सामाजिक व पत्रकार संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.या सन्मानानंतर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फिरोज पिंजारी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
- हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.