संपादक हसीबुर शेख ✍️:-
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :-
नगरदेवळा परिसरातील होळ शिवारात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अवकाळी संकटामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान:-
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, उभी केळीची पिके अक्षरशः जमिनीला लागली. या नैसर्गिक आपत्तीत खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे:
प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठलसिंग परदेशी
अफजल खान फत्ते खान
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या शेतकऱ्यांच्या बागांचे जवळपास ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या काळात आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, संपूर्ण वर्षभराची मेहनत क्षणात मातीमोल झाली आहे.
तातडीने पंचनाम्याची मागणी:-
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, कृषी विभाग आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक बाधित शेतकरी व ग्रामस्थांकडून दिली जात आहे.
शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान:-
प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठल परदेशी
अफजल खान फत्ते खान यांनी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने आणि भांडवल लावून केळीची लागवड केली होती. केळीची झाडे काढणीला निस्वाडला आलेली असतानाच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने प्रकाश बाळीराम परदेशी, गंगासिंग राधाकिसनसिंग परदेशी,सुनील विठ्ठल परदेशी,अफजल खान फत्ते खान
प्रशासनाकडे मदतीची अपेक्षाकेळीच्या नुकसानीमुळे होळा शिवारा शेतकरी प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठल परदेशी
अफजल खान फत्ते खान यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेतात धाव घेतली. दरम्यान, महसूल विभागाने आणि कृषी विभागाने त्वरित घटनास्थळी पंचनामा करावा, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.