नगरदेवळा येथे आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स चा थाटात शुभारंभ

नगरदेवळा प्रतिनिधी हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

आरोग्याची सेवा आणि विश्वासाची हमी देणाऱ्या आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स’चा भव्य उद्घाटन समारंभ शनिवारी दि. १८ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला. नगरदेवळा येथील मुख्य बाजारपेठेत विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स येथे महादेव मंदिरासमोर असलेल्या या नूतन दुकानाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
डॉ. निलेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अस्थिरोग तज्ञ डॉ. निलेश पाटील (भडगाव) यांच्या शुभहस्ते दुकानाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. निलेश पाटील यांनी नूतन मेडिकलच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हीच शिदोरी घेऊन अजय शिरुडे दाम्पत्य या क्षेत्रात उतरले आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती
या समारंभास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, सरपंच प्रतीक्षा ताई काटकर, भाजपा नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय मुन्ना भाऊ भंडारकर,अविनाश आबा कुडे, पोलीस उपनिरीक्षक (PSI) योगेश गंगे, योगेश महाराज धामणगावकर, समर्थ हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. निलेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांच्यासह गावातील सर्व डॉक्टरांचा समावेश होता.

आरोग्याची सेवा आणि विश्वासाची हमी देणारे आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स हक्काचे आणि विश्वासार्ह ठिकाण

आरोग्य सेवेमध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व असते. रुग्णांना योग्य वेळी आणि खात्रीशीर औषधोपचार मिळावेत या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स बद्दल बोलताना मोरया मेन्स वेअरचे संचालक आणि आता नवीन व्यवसायाचे कारभारी व आदर्श मेडिकल संचालक अजय शिरूडे यांचे लहान भाऊ कल्पेश शिरुडे यांनी विशेष कौतुक केले आहे.
​के कल्पेश शिरूडे म्हणाले की आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स’ आपल्या ग्राहकांसाठी केवळ एक औषधांचे दुकान नसून आरोग्याची सेवा आणि विश्वासाची हमी देणारे एक हक्काचे ठिकाण बनले आहे.
​नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून दर्जेदार औषधांचा पुरवठा आणि ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे हे मेडिकल स्टोअर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी आणि विश्वासासाठी नेहमी आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स ला पसंती द्यावी असे आवाहनही अजय शिरूडे यांनी यावेळी केले.

सर्वांचे आभार

आदर्श मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स’चे संचालक अजय शिरूडे यांचे मोठे भाऊ अक्षय भागवत शिरुडे आणि सौ. शुभांगी अक्षय शिरुडे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद आणि सहकार्य हीच आमच्या कार्याची प्रेरणा आहे. आरोग्य क्षेत्रात उत्तम दर्जाच्या औषधांचा पुरवठा करून ग्राहकांना योग्य सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेसाठी या नवीन केंद्राला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरदेवळा महावितरणच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका; रस्त्यावर पडलेले झाड उचलण्यास टाळाटाळ

नगरदेवळा विशेष प्रतिनिधी:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनीच्या सुरक्षेच्या नावाखाली झाडांची छाटणी केली मात्र काम संपल्यानंतर तोडलेली झाडे आणि फांद्या तशाच रस्त्यावर सोडून दिल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. मागील ३-४ दिवसांपासून हा कचरा रस्त्यावर पडून असून, यामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक जुनेद शेख गुलामनबी यांनी सांगितले की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम करून काढलेले झाड रस्त्यातून हलवण्याची साधी तसदीही घेतली नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी सातत्याने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फोन करून हे अडथळे दूर करण्याची विनंती करत आहे. मात्र प्रत्येक वेळी आश्वासने देऊन टोलवाटोलवी केली जात आहे. अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

अपघाताची भीती
रस्त्यावर पडलेल्या या झाडांमुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांची मोठी अडचण होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे हे अडथळे दिसत नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील कचरा आणि झाडांचे अवशेष उचलून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जुनेद शेख गुलामनबी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नगरदेवळा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कचरा आणि नालीचा प्रश्न सुटला सामाजिक कार्यकर्ते इम्रान सय्यद यांच्या पुढाकाराने तातडीने काम पूर्ण

संपादक हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

गेल्या अनेक दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या महावितरणच्या डी.पी. क्रमांक ११४२ जवळ वायरमन आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या ठिकाणी असलेल्या उघड्या नालीमुळे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे वायरमनला फ्युज टाकण्यासाठी जीव धोक्यात घालून नाली ओलांडून जावे लागत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेताच परिसरातील जागरूक व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते इम्रान अली आसिफ अली सय्यद यांनी तातडीने यात लक्ष घातले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात आला आहे.

काय होती नेमकी समस्या
बाजार समिती परिसरातील महावितरणच्या डी.पी. ११४२ जवळ एक मोठी नाली (गडार) वाहते. या नालीची दुरवस्था झाल्यामुळे आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यामुळे येथे येणे-जाणे अत्यंत कठीण झाले होते. जेव्हा जेव्हा परिसरातील वीज गुल व्हायची, तेव्हा वायरमनला फ्युज टाकण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी याच दुर्गंधीयुक्त नालीतून आणि कचऱ्यातून मार्ग काढावा लागत होता. यामुळे अपघाताची आणि आरोग्याची मोठी भीती निर्माण झाली होती.

नेत्यांच्या तात्काळ पुढाकाराने सुटला प्रश्न
वायरमनची ही अडचण पाहून सामाजिक कार्यकर्ते इम्रान अली सय्यद यांनी थेट प्रशासकीय पातळीवर आणि लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. त्यांनी माजी सरपंच सौ. प्रतीक्षा किरण काटकर यांच्याशी संपर्क साधून या समस्येचे गांभीर्य पटवून दिले.
माजी सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. कल्पना भगवान चौधरी व श्री. धनराज भगवान चौधरी यांनी या समस्येची तात्काळ दखल घेतली. कोणतीही दिरंगाई न करता, तातडीने घटनास्थळी जेसीबी (JCB) मशीन पाचारण करण्यात आले.

परिसर झाला चकाचक
जेसीबीच्या सहाय्याने नालीचे (गडार) योग्य पद्धतीने रुंदीकरण आणि नियोजन करण्यात आले जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. तसेच डी.पी. परिसरामध्ये साचलेला संपूर्ण कचरा पूर्णपणे साफ करून जागा मोकळी आणि स्वच्छ करण्यात आली. यामुळे आता वायरमनला कोणत्याही त्रासाशिवाय आणि सुरक्षितपणे आपले कर्तव्य बजावता येणार आहे.

वायरमन हा जनतेला वीज सेवा देण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. त्यांना काम करताना अशा त्रासाला सामोरे जावे लागणे चुकीचे होते. हा प्रश्न आमच्या निदर्शनास येताच आम्ही लोकप्रतिनिधींच्या मदतीने तो तात्काळ सोडवला. गावाच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.
इम्रान अली आसिफ अली सय्यद (सामाजिक कार्यकर्ते, नगरदेवळा)

कामाचे सर्वत्र कौतुक
या वेळी महावितरणचे कर्मचारी इम्रान खान आणि ग्रामपंचायत कर्मचारी (मुकादम) शरद बागुल उपस्थित होते. या कामामुळे आता वायरमनला डीपीची दुरुस्ती करणे सोपे होणार असून, परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या जनहितार्थ केलेल्या कार्याचे नगरदेवळा परिसरातून कौतुक होत आहे.

इम्रान अली सय्यद यांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि माजी सरपंच प्रतीक्षा काटकर माजी ग्रा.पं. सदस्य कल्पना चौधरी व धनराज चौधरी यांनी दाखवलेली तत्परता याबद्दल बाजार समिती परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे जाहीर आभार मानले जात आहेत व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरदेवळ्यात शेतकरी संतप्त विष्णू नगर फिडरवरील वीज समस्येबाबत सब स्टेशनवर धडक निवेदन सादर

संपादक हसीबुर शेख
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज


सध्या कडक उन्हाचा कडाका आणि त्यातच महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नगरदेवळा परिसरातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. नगरदेवळा शिवारातील विष्णू नगर ४ फिडर अंतर्गत येणाऱ्या ३ नंबर फिडरवर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिवसा ६ तास वीज पुरवठा मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ २ तास वीज दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सततच्या वीज खंडित होण्यामुळे (लाईट जाण्यामुळे) शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या केळी बागा जळून खाक होण्याच्या मार्गावर असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
या तीव्र अन्यायाविरुद्ध आज शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थेट नगरदेवळा सब स्टेशनवर धडक दिली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत लेखी निवेदन सादर केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 54;


६ तासांचे आश्वासन, फक्त २ तास पुरवठा! केळी बागा धोक्यात
विष्णू नगर परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून, अतोनात कष्ट करून केळीच्या बागा फुलवल्या आहेत. केळीच्या पिकाला या दिवसांत पाण्याचा मोठा आधार लागतो. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना किमान ६ तास वीज मिळणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणच्या विस्कळीत कारभारामुळे विष्णू नगर फिडरवर केवळ २ तास वीज चालते आणि वारंवार ट्रिपिंग होते. यामुळे पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने डोळ्यांदेखत केळीच्या बागा सुकू लागल्या आहेत. “महावितरणच्या या मनमानीमुळे आमच्या तोंडचा घास हिरावला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली.
शेतकरी संघटनेची सब स्टेशनला धडक
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत शेतकरी संघटनेने आक्रमक पाऊल उचलले. आज नगरदेवळा सब स्टेशन गाठून महावितरणचे अधिकारी कदम साहेब यांना घेराव घालण्यात आला आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करून मंजूर वेळेनुसार अखंडित वीज न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी व शेतकरी:
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना महाजन, शहर अध्यक्ष मयुर मारवाडी, यांच्यासह प्रमुख शेतकरी मंगेश चौधरी, भैया महाजन, प्रकाश महाजन, सत्यवान महाजन, गोकुळ महाजन, प्रफुल सोनार आदींसह विष्णू नगर भागातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा इशारा
“आम्ही वीज बिल नियमित भरतो, मग आम्हाला हक्काची वीज का मिळत नाही? महावितरणने जर तात्काळ विष्णू नगर फिडरचा वीज पुरवठा सुधारला नाही आणि आमच्या केळी बागांचे नुकसान थांबवले नाही, तर आगामी काळात महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.

सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती..

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडत जनतेच्या समस्या प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचविणारे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकजागृतीचे प्रभावी कार्य करणारे किशोर रामदास रायसाकडा यांची धाडस सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायसाकडा यांच्या कार्याला नवी ओळख आणि मोठी जबाबदारी प्राप्त झाली आहे.

धाडस सामाजिक संघटनेचे मराठवाडा विभागीय सचिव बाळासाहेब माने यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. रायसाकडा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जनहिताच्या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर जळगाव जिल्ह्याच्या सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

धाडस सामाजिक संघटना राज्यभर सामाजिक न्याय, जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद (दादा) कोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबविण्यात येत असून सोशल मीडिया हे संघटनेच्या कार्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. जळगाव जिल्ह्यात संघटनेची विचारधारा, सामाजिक उपक्रम आणि जनहिताचे प्रश्न अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम आता किशोर रायसाकडा यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नियुक्तीनंतर बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम असून समाजातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. किशोर रायसाकडा यांचा अभ्यासू दृष्टिकोन, सामाजिक प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे पाचोरा आणि जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रायसाकडा यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक गतिमान करून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार रायसाकडा यांनी व्यक्त केला आहे.
जनतेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून बुलंद करणाऱ्या किशोर रायसाकडा यांच्या या नियुक्तीकडे जळगाव जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

या अगोदरही किशोर रायसाकडा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष पद भुषविले आहे त्यांनी विभागावर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत त्यामुळेच पत्रकार किशोर रायसाकडा यांना मुंबई, पुणे,ठाणे, शिर्डी येथे बहुसंख्य राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असनारे रायसाकडा यांना राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष ह्या जबाबदारीचे पद त्यांच्याकडे आहे.

मागील किशोर रायसाकडा (कोळी) यांच्या कडे पाचोरा कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष हे पद देखील त्यांनी भुषविले आहे.

नगरदेवळा पोलीस आऊट पोस्टवर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; ३० खेड्यांचे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


संपादक हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज


नगरदेवळा येथील पोलीस आऊट पोस्टवर सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आणि वाढता कामाचा ताण पाहता, येथे तातडीने अधिक महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या कार्यरत असलेल्या मोजक्या पाच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसराची जबाबदारी असल्याने कायदा व सुव्यवस्था राखताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

नेमकी अडचण काय:-
नगरदेवळा हे एक महत्त्वाचे केंद्र असून, केवळ नगरदेवळा गावच नव्हे तर या परिसरातील तब्बल ३० गावांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी याच आऊट पोस्टवर आहे. पाचोरा पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामाचा ताण, ठाणे अंमलदार ड्युटी, बंदोबस्त आणि नदी परिसरातील गस्त अशा विविध कामांसाठी केवळ पाच कर्मचारी धावपळ करत आहेत. इतक्या कमी मनुष्यबळात ३० गावांचा आवाका सांभाळणे अशक्य असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांची मागणी:-
“पाच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी नेमकी कुठे आणि कशी हजेरी लावता येईल? एकाच वेळी अनेक ठिकाणी घटना घडल्यास पोलीस पोहोचेपर्यंत मोठी अडचण निर्माण होऊ शकते,” अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महिला पोलिसांची उपस्थिती नसल्याने महिलांशी संबंधित तक्रारींच्या निवारणातही अडचणी येत आहेत.


या गंभीर परिस्थितीचा विचार करून, पोलीस अधीक्षक, जळगाव आणि पोलीस निरीक्षक, पाचोरा यांनी तातडीने नगरदेवळा पोलीस आऊट पोस्टवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी व महिला पोलिसांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.

आखातवाडा शिवारात शेतकऱ्याला मोठा फटका; तीन गायींची दिवसाढवळ्या चोरी

संपादक हसीबुर शेख ✍️

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज

नगरदेवळा येथील रहिवासी उत्तमसिंह फकिरासिंग परदेसी यांच्या शेतीतून तीन गायी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमसिंह परदेसी यांची नगरदेवळा येथील अखतवाडा शिवारात शेती आहे (गट नंबर ६३). नेहमीप्रमाणे ते आपल्या पशुधनाची निगा राखत असताना, ८ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतातील तीन गायी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या.

चोरीला गेलेल्या या तीनही गायींची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये इतकी आहे. अचानक घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परदेसी कुटुंब हवालदिल झाले असून, त्यांच्या उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे.

पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी
दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी होण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
टीप: अशा प्रकारच्या घटना वाढू नयेत, यासाठी गावकरी आणि प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे. या घटनेच्या सविस्तर तपासातून चोरटे लवकरच गजाआड होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाचोरा येथे भाजप-महायुतीचा निर्धार: जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला मान्यवरांचे बळ; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून शुभेच्छा

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पाचोरा येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उमेदवाराचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस सदिच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती आणि पाठिंबा

या महत्त्वपूर्ण प्रसंगी महायुतीतील सर्वच घटक पक्षांमधील दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजुमामा भोळे, जळगाव पूर्व विभाग भाजप जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. रावसाहेब मनोहर पाटील, तसेच श्री. जितेंद्र पाटील, श्री. मधुकर काटे आणि श्री. सुमित पाटील यांसारख्या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता. याशिवाय शिवसेनेचे सर्व नगरसेवकही यावेळी उपस्थित राहून त्यांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

“जनतेची सेवा करण्याचा संकल्प दृढ”

सर्व मान्यवरांकडून मिळालेल्या शुभेच्छा, पाठिंबा आणि त्यांच्यावरील विश्वासाने आगामी निवडणुकीत अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने कार्य करण्याची मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना उमेदवाराने व्यक्त केली आहे. महायुतीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीने जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीची ताकद अधिकच वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

पाचोरा येथील या भेटीगाठीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक महायुती एकदिलाने लढणार असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी काळात ही साथ आणि विश्वास जपत विकासाचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

देशसेवेसाठी आयुष्यातील तब्बल 23 वर्षे समर्पित करणारे सार्वे गावाचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभर विविध ठिकाणी सेवा बजावतांना त्यांनी शांतीदूत म्हणून इस्राईल व सिरीया येथेही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यासाठी सार्वे गावासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभेदार जितेंद्र पाटील यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल – ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात परिसरातील माजी सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर, आमदार मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश नाना चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र (रवी बाबा) पाटील, समाधान पाटील, हभप ज्ञानेश्वर माऊली हिंगोणे, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सैनिकाची मुलगी मनस्वीचे भावनिक मनोगत :- कार्यक्रमात सुभेदार पाटील यांची कन्या मनस्वी जितेंद्र पाटील हिने आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करतांना सैनिक कुटुंबाचे आयुष्य, त्याग आणि अभिमान यांचा उल्लेख केला. तिच्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.* सैनिकांना कलेक्टरपेक्षाही अधिक मान मिळायला हवा – शुभांगी पाटील :- राज्य उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या जितेंद्र पाटील यांनी ते प्रत्यक्षात साकार केले. सैनिकांना समाजात सर्वोच्च सन्मान मिळायला हवा. जिथे सामान्य नागरिक पोहोचू शकत नाहीत, तिथे सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी उभे असतात. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा त्यागही तितकाच महत्त्वाचा असतो. आता देशसेवेप्रमाणेच समाजसेवेतही त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.* सैनिकांच्या सत्कारासाठी जात-धर्म लागत नाही – समाधान पाटील :- समाधान पाटील यांनी सैनिकांचा गौरव करतांना सांगितले की, सैनिकांच्या सन्मानासाठी जात किंवा धर्माची आवश्यकता नसते. आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगतो, कारण सीमांवर सैनिक सतत पहारा देत असतात. सैनिकांना सॅल्यूट करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.* शेतकरी, सैनिक आणि शिक्षक सर्वाधिक प्रामाणिक – प्रमोद पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या वडिलांनीही सैन्यात सेवा बजावली असल्याने सैनिक कुटुंबांच्या त्यागाची त्यांना जाणीव आहे. शेतकरी, सैनिक आणि शिक्षक हे समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असून देशसेवेपेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणतेही नाही, असे ते म्हणाले.* एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी दिल्याबद्दल मातेला वंदन – प्रणय भांडारकर :- भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ भांडारकर यांनी सुभेदार पाटील यांच्या मातेला वंदन करीत, एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी पाठविण्याचे धाडस मोठे असल्याचे सांगितले. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या पत्नीची आणि कुटुंबाचीही मोठी भूमिका असते, असे त्यांनी नमूद केले.* कुटुंबाचे ऋण कधीच फेडू शकणार नाही – सुभेदार जितेंद्र पाटील :- सत्काराला उत्तर देतांना सुभेदार जितेंद्र पाटील भावूक झाले. त्यांनी 23 वर्षांच्या सेवाकाळातील चांगले-वाईट अनुभव, आव्हाने आणि आठवणींना उजाळा दिला. सेवानिवृत्त झालो असलो तरी सहकाऱ्यांशी आणि समाजाशी असलेले नाते कायम राहील. माझ्या कुटुंबाने दिलेला त्याग आणि साथ यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.* तरुणांनी सैन्यभरतीकडे वळावे – रावसाहेब पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी प्रथम सुभेदार पाटील यांच्या आई-वडिलांना नमन केले. त्यांनी सांगितले की, 23 वर्षे देशसेवा करणे हे साधे काम नाही. आजच्या तरुणांनी सैन्यभरतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. जितेंद्र पाटील यांनी आपल्या अनुभवाचा लाभ तरुणांना देऊन अधिकाधिक युवक सैन्यात दाखल होतील यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:

संपादक हसीबुर शेख ✍️ :-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा व होळ येथील दिनांक ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ गाव होळ शिवारातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत, पाचोरा तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवार, २ जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करण्यात आले.वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आजच्या पंचनामा मोहिमेत तालुक्याच्या सहाय्यक कृषी अधिकारी सौ. वैशाली चव्हाण, होळ शिवाराचे तलाठी शिरसा आप्पा आणि कोतवाल सुधाकर पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि अहवाल तयार केला.

यावेळी : भाजप नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय दिलीप भंडारकर आणि विलास भामरे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: प्रणय भंडारकर आणि विलास पाटील यांनी घेतली पिकांची पाहणीनुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भाजपा नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय मुन्ना दिलीप भंडारकर आणि माजी उपसरपंच विलास पाटील (पिंटू भामरे) यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर येऊन दखल घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.41527778, 0.41563275);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 58;

या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान:

वादळामुळे प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत:

प्रकाश बाळीराम परदेशी,गंगासिंग राधाकिसनसिंग परदेशी,सुनील विठ्ठल परदेशी,अफजल खान फत्ते खान,साहेबराव चिमण पाटील,शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

२०२५ च्या नुकसान भरपाईपासून शेतकरी अजूनही वंचित; माजी सरपंचांची टीका:-

मागच्या वर्षी (२०२५ मध्ये) झालेल्या नैसर्गिक नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत नगरदेवळा येथील माजी सरपंच प्रकाश बळीराम परदेशी आणि अफजल खान फत्ते खान यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने पंचनामे करून बराच काळ लोटला असला तरी, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी मागणी प्रकाश परदेशी आणि अफजल खान यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.होळ शिवारात पंचनाम्यादरम्यान संवेदनहीनता;

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप:-

निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान आणि त्यातच प्रशासकीय यंत्रणेची असंवेदनशीलता यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे होळ (ता. पाचोरा) शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पथकाने वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडावरच “याला काही नुकसान म्हणता का? केवळ दोन-तीन झाडेच तर पडली आहेत,” असे म्हणत शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पिकांचे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले असताना, भरपाई मिळण्याच्या आशेने शेतकरी पंचनामा करणाऱ्या पथकाकडे आशेने पाहत होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;

मात्र, पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करताना अत्यंत निष्काळजीपणा दाखवला. शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्याऐवजी, “तुमचे कुठे नुकसान झाले आहे असा उपरोधिक सवाल करत, पडलेल्या झाडांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला.पंचनामा हा शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शकपणे होणे अपेक्षित असताना, अधिकारी अशा प्रकारे शेतकरी विरोधी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदार विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5416667, 0.4528536);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 56;