🛑 भडगाव नगरपरिषदेचा ‘ॲक्शन प्लॅन’! पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा ‘महाअभियान’ धडाका सुरू.

(संपादक हसीबुर शेख ✍️):-

📞९३०७५९९९८३

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):-

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी भडगाव नगरपरिषदेने कंबर कसली आहे. दिनांक २० मे पासून संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने ‘मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई अभियान’ अत्यंत आक्रमकपणे सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे पावसाळ्यात भडगावकरांना दिलासा मिळणार असून नगरपरिषदेच्या या तत्परतेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

​ बाळद रोडपासून मोहिमेचा ‘धडाका’ सुरू!

​या अभियानाची सुरुवात बाळद रोड परिसरापासून करण्यात आली आहे. येथे ड्रेनेज सफाईसोबतच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झाडे-झुडपे आणि मातीचे ढिगारे जेसीबीच्या (JCB) साहाय्याने युद्धपातळीवर हटवले जात आहेत. मागील वर्षीचा पावसाळ्यातील अनुभव लक्षात घेऊन, यंदा कुठेही पाणी साचणार नाही अशा कडक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

​ ३ जूनपर्यंत ‘नॉन-स्टॉप’ स्वच्छता: जाहीर झाले वेळापत्रक

​येत्या १५ ते २० दिवसांत जेसीबी आणि मनुष्यबळाचा पूर्ण वापर करून शहर चकाचक केले जाणार आहे. २० मे ते ३ जून दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेसाठी खालील भागांचे विशेष वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:

  • प्रमुख भाग: बाळद रोड दुतर्फा ड्रेनेज, तळणी ते बाळद रोड, जयकिसान कॉलनी, दत्तनगर परिसर.
  • मोरी व वसाहती: भगीरथ किराणा जवळील काँक्रीट मोरी, जयहिंद कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, पोलीस लाईन, एच कॉलनी.
  • मुख्य रस्ते व संस्था परिसर: शिवनेरी गेट ते सिव्हील हॉस्पिटल, गणपती मंदिर ते सिव्हील हॉस्पिटल, आदर्श कन्या शाळा परिसर, न्यायालय परिसर, भागवत कॉलनी व मुख्य रस्ते.
  • मोठे नाले (मुख्य विसर्ग): कोल्हा नाला, ग्रीन पार्क कॉलनी नाला, टोनगाव नाला, यशवंत नगर नाला.

​🤝 लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा ‘कडक’ समन्वय

​हे महाअभियान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखा प्रदीप मालचे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र महादू पाटील, गटनेते श्री. लखीचंद पाटील, आरोग्य सभापती इम्रान अली सय्यद यांच्या थेट सहकार्याने राबवले जात आहे.

​स्थानिक पातळीवर प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील व नगरसेवक श्री. अमोल नाना पाटील, प्रभाग ९ च्या नगरसेविका सौ. वैशाली विशाल पाटील व नगरसेवक श्री. विजयकुमार भोसले, प्रभाग १० च्या नगरसेविका सौ. ज्योती जितेंद्र पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सौरभ राजेंद्र पाटील यांनी एकत्र येत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार आरोग्य विभागाचे इंजिनिअर सत्यम पाटील, श्रीमती निशा लोट आणि क्लर्क छोटू वैद्य यांनी प्रभागनिहाय अचूक सफाई आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे.

📍 उर्वरित प्रभागांचेही नियोजन सुरू:

शहरातील इतर प्रभागांमध्येही स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून पावसाळ्यातील अडचणींचे निवारण करण्यासाठी सफाईचे नियोजन युद्धपातळीवर केले जात आहे.

​👍 नागरिकांमधून समाधान!

​शहरातील मोठे पाण्याचा विसर्ग होणारे मार्ग आणि मुख्य नाले साफ होत असल्याने भडगावच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती आणि आजारपणं टाळण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला हा निर्णय आणि प्रत्यक्ष मैदानात सुरू असलेले काम पाहून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नगरदेवळा येथे सोमवारच्या आठवडे बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक अन् वाहनधारक त्रस्त!

नगरदेवळा (विशेष प्रतिनिधी):-

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज) :-

नगरदेवळा येथील सोमवार, दिनांक १८ मे रोजी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य बाजारपेठ आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) झाल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीमुळे बाजारात आलेले नागरिक, महिला, व्यापारी आणि वाहनधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.अस्ताव्यस्त वाहने आणि अतिक्रमणाचा विळखा नगरदेवळा येथील सोमवारचा आठवडे बाजार हा परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.

आज बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यातच बाजारात येणाऱ्या नागरिकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पार्क केल्यामुळे वाहतुकीचा पार बोजवारा उडाला.तासनतास रखडली वाहतूकवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते. कडक उन्हात लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. काही वेळ तर रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनेही या कोंडीत अडकून पडली होती.

दर आठवड्याला बाजाराच्या दिवशी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत आणि प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीदर सोमवारी होणाऱ्या या त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी बाजाराच्या दिवशी वाहतूक नियोजनासाठी चोख व्यवस्था करावी, तसेच रस्त्यावरील तात्पुरती लावलेले गाड्या हटवून वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नगरदेवळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

विशेष म्हणजे, या आठवडे बाजारात होणारी गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचे नेहमीच पूर्ण सहकार्य लाभते. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. मात्र, बाजारातील वाढती गर्दी आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे नगरदेवळाचे इंद्रनिल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!

संपादक हसीबुर शेख ✍️ :-

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ):-

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि गतिमान कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा बुद्रुक येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील यांना अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र राज्य समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी शिर्डी येथील प्रसिद्ध ‘हॉटेल 9 Coin’ च्या सभागृहात संपन्न झाला.लोकसेवेची पावती: सन्मान इंद्रनिल पाटील यांचा!श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील यांनी नगरदेवळा बुद्रुक व परिसर क्षेत्रात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे, गरजूंची मदत करणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रभागी राहून काम केले आहे. त्यांच्या याच निःस्वार्थी आणि अविरत लोकसेवेची दखल घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना हा राज्यस्तरीय बहुमान प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रविंद्र रा. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (प्रतिष्ठान अतिरिक्त नोंदणी क्रमांक: Reg. No. महाराष्ट्र / ९९१ | ISBN NO. 978-93-95 318-17-4).

वारसा पुढे नेण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव:-

इंद्रनिल पाटील यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच पाचोरा तालुका आणि नगरदेवळा परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्या सामाजिक कार्याचा हा गौरव असून, भविष्यातही जनतेची सेवा करण्याचा वारसा असाच पुढे सुरू राहो,” अशा शब्दांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रविंद्र गुंजाळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

“हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, मला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्या नगरदेवळा ग्रामस्थांचा आहे. या सन्मानामुळे समाजकार्याची जबाबदारी आणखी वाढली असून, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल.”— श्री. इंद्रनिल साहेबराव पाटील (पुरस्कार विजेते)

सध्या सोशल मीडियासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून श्री. इंद्रनिल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.

सावधान! मालेगावच्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’मुळे चेहऱ्यावर गंभीर दुष्परिणाम; ग्राहकांमध्ये संतापाची लाट

मालेगाव:- (विशेष /प्रतिनिधी ):-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

सध्या बाजारात सौंदर्याची खात्री देणाऱ्या अनेक क्रीम्सची मोठी जाहिरात केली जात आहे. मात्र, मालेगाव येथे उत्पादित होणाऱ्या ‘अल्फा ब्युटी क्रीम’ (Alpha Beauty Cream) मुळे अनेक ग्राहकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर जबरदस्त साईड इफेक्ट होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नेमका प्रकार काय:-

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेपणाचा आणि डाग विरहित त्वचेचा दावा करणाऱ्या या क्रीमचा वापर केल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडणे, त्वचा जळजळणे, लालसरपणा येणे आणि खाज सुटणे असे प्रकार घडत आहेत. काही दिवसांच्या वापरानंतर चेहरा उजळण्याऐवजी अधिकच खराब होत असल्याचा अनुभव त्रस्त ग्राहकांनी मांडला आहे.

तज्ज्ञांचा इशार:-

त्वचारोग तज्ज्ञाच्या मते, अशा स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या क्रीम्समध्ये अनेकदा स्टेरॉइड्स किंवा घातक रसायनांचा अतिवापर केलेला असतो. यामुळे सुरुवातीला त्वचा उजळल्यासारखी वाटते, मात्र कालांतराने त्वचेचा नैसर्गिक पोत खराब होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.

ग्राहकांचे आवाहन:-

ज्या ग्राहकांनी ही क्रीम वापरली आहे, त्यांनी तातडीने वापर थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच, संबंधित प्रशासनाने आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या उत्पादनाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.”सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना ती अधिकृत आहेत का आणि त्यांचे घटक काय आहेत, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. जाहिरातीला बळी पडून स्वतःच्या आरोग्याशी खेळ करू नका.”

नगरदेवळा विद्यालयाची यशाची परंपरा कायम; उच्च माध्यमिक परीक्षेत उर्दू विभागाचा डंका

(संपादक हसीबुर शेख ✍️):

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज

नगरदेवळा ग्राम शिक्षण समिती संचलित, सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) निकालात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेषतः विद्यालयाच्या उर्दू भाषा विभागाने तिन्ही शाखांमध्ये घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.शाखानिहाय निकालाचा तपशीलया परीक्षेत उर्दू भाषा विषय निवडून एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांचा निकाल खालीलप्रमाणे आहे:

विज्ञान शाखा (Science): एकूण ९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच्या सर्व (१००%) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखा (Arts): एकूण २१ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २ विद्यार्थी अनुत्तीर्ण तर १ विद्यार्थी गैरहजर होता.किमान कौशल्य (Technical): या शाखेतून २ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवविद्यालयातील उर्दू भाषा विभागातून तिन्ही शाखांमधील गुणानुक्रम खालीलप्रमाणे आहे:

विज्ञान शाखा (Science)

पहिले क्रमांक विद्यार्थ्याचे नाव टक्केवारी प्रथम

तांबोळी शिफा नाज गुलाम गौस ७३.५०%

द्वितीय शेख एराफ शेख मुश्ताक ६१.५०%

तृतीय हुजेफा नाज अब्दुल रज्जाक शेख ६१.१७%

कला शाखा (Arts)

पहिले क्रमांक विद्यार्थ्याचे नाव टक्केवारीप्रथम

मन्यार समरीन बी जाविद ७०.१७%

द्वितीय शेख बुशरा नाज शेख रऊफ ६४.३३%

तृतीय शगुफ्ता बानो अन्सार बेग ६३.१७%

उर्दू भाषा विभाग (सर्व शाखांमधून प्रथम ३)

१. तांबोळी शिफा नाज गुलाम गौस (७३.५०%)

२. मन्यार समरीन बी जाविद (७०.१७%)

३. शेख बुशरा नाज शेख रऊफ (६४.३३%)

मान्यवरांकडून कौतुकया देदीप्यमान यशाबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब सुभाषजी थेपडे, मानद सचिव बापूसाहेब शिवनारायणजी जाधव, संचालक दादासाहेब किशोर पाटील, अप्पासाहेब जगन्नाथ पाटील, तात्यासाहेब वामन पाटील, दादासाहेब हाजी अब्दुल गनी सेठ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, डी. पी. राजपूत, संजीव बावस्कर, गणेश पवार, मनिषा जाधव, संजय माळी, शरद महाजन आणि उर्दू विभाग परीक्षा समन्वयक सादीक शेख सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.”

नगरदेवळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणार? जून-जुलैमध्ये प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता

नगरदेवळा (विशेष/प्रतिनिधी):

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज)

नगरदेवळा येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार बळकटी मिळत आहे. आगामी जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान नगरपंचायतीच्या स्थापनेबाबतची अधिसूचना किंवा महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.महत्त्वाचे मुद्दे:सूत्रांची माहिती: मंत्रालयीन स्तरावर आणि जिल्हा प्रशासनाकडे नगरदेवळा नगरपंचायतीबाबतचा प्रस्ताव प्रलंबित असून, त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय बदल: ग्रामपंचायतीचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहराच्या विकासासाठी नगरपंचायत होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.निवडणूक समीकरणे: जर जून-जुलैमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र पूर्णपणे बदलू शकते.

विकासाची नवी आशानगरपंचायत झाल्यास शहराला अधिक निधी प्राप्त होईल, ज्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांना गती मिळेल. सध्या ग्रामपंचायत स्तरावर मर्यादा येत असल्याने, ‘नगरपंचायत’ हा पर्याय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरू शकतो.

“नगरदेवळा शहराचा वाढता विस्तार पाहता, नगरपंचायत होणे ही काळाची गरज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जून-जुलैमध्ये यावर शिक्कामोर्तब झाल्यास शहरवासीयांसाठी ही मोठी बातमी असेल.

सूचना: ही बातमी प्राप्त प्राथमिक माहिती आणि सूत्रांच्या हवाल्याने तयार करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेसाठी शासन निर्णयाची (GR) प्रतीक्षा करावी लागेल

नगरदेवळा: शिक्षक धैयसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

संपादक हसीबुर शेख ✍️:

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज

नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार हायस्कूलचे आदर्श शिक्षक धैयसिंग प्रतापसिंग राजपूत हे आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करून शेकडो विद्यार्थी घडवणाऱ्या राजपूत सरांचा सन्मान करण्यासाठी नगरदेवळा परिसरातून मोठा जनसमुदाय जमला होता.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

​या प्रसंगी नगरदेवळा दिगर सोसायटीचे चेअरमन शैलेंद्रसिंग शिवाजीसिंग परदेशी ऊर्फ ( मुन्ना काका)यांनी राजपूत सरांच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले. मुस्लिम विकास सोसायटीचे संचालक अन्सार शेख (अन्नू मेंबर) यांनी सरांच्या सामाजिक सलोख्याच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

​यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते:

  • शैलेंद्रसिंग शिवाजीसिंग परदेशी ऊर्फ (मुन्ना काका) (चेअरमन, नगरदेवळा दिगर सोसायटी)
  • अन्सार शेख ऊर्फ अन्नू मेंबर (संचालक, मुस्लिम विकास सोसायटी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य)
  • रावसाहेब अभिमान पाटील
  • किरण राजपूत

भावनिक निरोप

​कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी धैयसिंग राजपूत सरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. “एक शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो, तो समाजाचा कायम मार्गदर्शक असतो,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

​या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि त्यांचे स्नेही उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात जनगणनेचा अनोखा उपक्रम; तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्वप्रथम नोंदवली आमदार किशोर आप्पा पाटलांची माहिती!


(संपादक हसीबुर शेख ✍️):.
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज

पाचोरा तालुक्यात २०२६-२७ च्या जनगणनेच्या पूर्वतयारीला आणि नोंदणीला एका विशेष उपक्रमाने सुरुवात करण्यात आली आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वात पहिली नोंदणी करून तहसीलदार विजय बनसोडे यांनी या मोहिमेचा तालुक्यात शुभारंभ केला.

प्रशासकीय तत्परता आणि लोकप्रतिनिधींचा पुढाकार:

जनगणना ही देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे धोरण ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या मोहिमेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्वतः पुढाकार घेत ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील प्रथम नागरिक आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपली माहिती देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला, जेणेकरून जनतेमध्ये या प्रक्रियेबद्दल सकारात्मक संदेश जाईल.

जनगणनेचे महत्त्व :.
यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, “जनगणनेच्या माध्यमातून मिळणारी अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना आणि सोयी-सुविधांचे नियोजन करण्यासाठी आधार ठरते. पाचोरा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहकार्य करून आपली अचूक नोंदणी करून घ्यावी.”

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन
पहिली नोंदणी केल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “जनगणना हे केवळ आकडेवारीचे काम नसून ते राष्ट्र उभारणीचे काम आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.”
या अनोख्या उपक्रमामुळे पाचोरा तालुक्यात जनगणनेच्या कामाला एक वेगळी गती मिळाली असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाचोरा पोलिसांचा ‘तळीरामांना’ दणका; उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी✍️):

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):.

पाचोरा येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात पाचोरा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी धडक कारवाई करत तब्बल २५ तळीरामांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.नेमकी कारवाई काय?शहरातील काही विशिष्ट भागात, तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि निर्जन स्थळी उघड्यावर मद्य पिण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक सूचनांनुसार पाचोरा पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी अचानक ‘फिल्डिंग’ लावली.पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सायंकाळच्या सुमारास शहरातील वेगवेगळ्या हॉटेलचे आडोसे, अंधाराचा फायदा घेणारी ठिकाणे आणि मोकळ्या मैदानात धाडी टाकल्या.

यावेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.पोलिसांचा इशारासार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यामुळे सामान्य नागरिकांना, महिलांना आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी दिला आहे.

आगामी काळातही ही मोहीम अशीच तीव्रपणे राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून स्वागत केले जात असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारीला लगाम बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा

(संपादक हसीबुर शेख ✍️):

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):.

मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर सर मा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे सर तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. योगेश पाटील सर डॉ. हर्षदा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आज रोजी 25 एप्रिल

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नगरदेवळा येथे तसेच सर्व उपकेंद्र स्तरावर जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला हा दिन संपूर्ण जगभरात हिवताप या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांचा या आजारातून बचाव होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

जागतिक हिवताप दिन 2007 पासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला

त्यानिमित्ताने नागरिकांमध्ये हिवतापाविषयी व त्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा करण्यात आला तसेच हिवताप होऊ नये व हिवताप झाल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत नागरिकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी उपस्थित नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील मा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील सर डॉक्टर हर्षदा पाटील मॅडम आरोग्य निरीक्षक-सागर अहिरराव आरोग्य सहाय्यक सुधीर जगताप समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गोविंद पवार डॉक्टर सुधीर देसले डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर शितल सोमवंशी प्रीतम पाटीलआरोग्य सेवक माधव मगर गजानन साखरे दीपक चौधरी कपिल पाटील अमोल गढरी कौशल पाटील आरोग्य सेविका श्रीमती अशा गढरी श्रीमती सरला मानकर श्रीमती कविता परदेशी श्रीमती रंजना परदेशी श्रीमती मनीषा गढरी श्रीमती ज्योती पाटील GNM पोर्णिमा गोपाल पाटील गटप्रवर्तक श्रीमती रूपाली पाटील श्रीमती चित्रा तायडे सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होते