नगरदेवळा येथे ‘वृत्त प्रभात’चा वर्धापन दिन आणि ईद मिलन सोहळा उत्साहात;

  • पत्रकार शाह जावेद बशीर यांचा विशेष गौरवनगरदेवळा (प्रतिनिधी):-जावेद शाह नगरदेवळा येथे शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन आणि रमजान ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘शिरखुर्मा’चा आस्वाद घेतला, ज्यामुळे शहरात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती:-
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार एस. के. पवार हायस्कूलचे प्राध्यापक उमेश काटकर सर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते निवृत्ती मोरे साहेब (सहाय्यक पोलीस फौजदार) हाजी अब्दुल गणी शेठ, कुडे आबा, वीरेंद्र भांडारकर, पिंटू भामरे, अभिलाषाताई रोकडे, पत्रकारितेचा गौरव:
  • शाह जावेद बशीर यांचा सत्कार:- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाह जावेद बशीर यांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’चे संपादक फारूक शाह नौमानी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार प्रदान करण्यात आला.तसेच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना (भडगाव) आणि साई टीव्हीएस (चाळीसगाव, येवला, कोपरगाव) चे संचालक वीरेंद्र अशोक भांडारकर, माजी उपसरपंच पिंटू भामरे, आदित्य परदेशी (आदित्य फाउंडेशन) यांच्यातर्फेही शाह जावेद बशीर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.वृत्त प्रभात’ विशेषांकाचे प्रकाशन:- वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘वृत्त प्रभात विशेषांकाचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अंकात सामाजिक आणि प्रादेशिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
  • पत्रकार आणि पोलीस बांधवांची उपस्थिती:- या सोहळ्याला पत्रकार आणि पोलीस प्रशासनातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होतीस्थानिक पत्रकार:- वरिष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, मिलिंद दुसाने, शैलेंद्र बिरारी, अली रजा खान, फारुख शेख, सोनू परदेशी, फिरोज पिंजारी, हशीबुर शेख.भडगाव-कजगाव पत्रकार संघ:- भानुदास हिलाल महाजन (जिल्हाध्यक्ष), नितीन सोनार, मांगीलाल मोरे, निलेश महाले, डॉ. बी. बी. भोसले, यश कुमार, हर्षल चौधरी.वृत्त प्रभात टीम:- संपादक फारुख शाह नौमानी,सय्यद कुदबुद्दीन, आमिन शाह, अय्युब शेख, जुबेर मणियार.पोलीस प्रशासन:- पोलीस कॉन्स्टेबल मजिद पठान, वैभव पाटील.राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर:-कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरांतील मान्यवर उपस्थित होते,
  • ज्यात प्रामुख्याने: नूर चेअरमन, सागर पाटील, बशीर शाह, रोशन जाधव सर, डॉ. युवराज गढरी, सादिक बागवान, आसिफ रजा खान, मेंबर सुनील महाजन, अशोक सान्नी, सोनू नाना, उमर रजा टेलर, इश्तियाक बेग, मोसिन बेग, सद्दाम शाह, राजेंद्र भांडारकर, कोकंणदे सर, पी. एम. पाटील सर, रोकडे सर, जाकीर सर, कन्हैया सिंग परदेशी, सुनील शिरोडे, शेर शाह, छोटू लोहार, शकील बागवान, गणेश देशमुख, मुदस्सर शेख, शेर खान, अजय शिरुडे, कडू पाटील, जब्बू शेख, अन्वर शेख.सामाजिक एकोप्याचा संदेश:- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘शिरखुर्मा’ पार्टीने आणि वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाने नगरदेवळा शहरातील सर्वधर्मीय बांधवांना एकत्र आणले. पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या व्यापारी व राजकीय वर्गाने कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार, फारुख शाह यांनी मानले

संगीतमय भजन संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • नगरदेवळा : अयोध्यापती रघुकुलतिलक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव (रामनवमी) पूर्वसंध्येला नगरदेवळा येथील राम मंदिर चौकात आयोजित भव्य संगीतमय भजन संध्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून “
  • श्रीराम जय राम जय जय राम” या गजरात सहभागी होत आध्यात्मिक आनंद अनुभवला.या भजन संध्येत रामराज्य भजनी मंडळ तसेच शिवराणा भजनी मंडळ यांनी सुमधुर भजन-कीर्तन सादर करत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून टाकला. श्रीरामांच्या विविध भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. पारंपरिक कीर्तन शैलीतून सादर करण्यात आलेल्या रचनांनी जुन्या भक्तिपरंपरेचा सुगंध दरवळत ठेवत नव्या पिढीलाही त्या भावविश्वाशी जोडण्याचे काम केले.
  • कार्यक्रमाच्या शेवटी प्रभू श्रीरामांच्या आरतीने मंगलमय समारोप करण्यात आला. सर्व भाविकांनी एकत्र येत आरतीत सहभाग घेत भक्तीभावाने प्रभूंचे स्मरण केले.या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अभिलाषा भिला रोकडे यांच्या शिवकन्या बहुउद्देशीय संस्था व महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमामुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

उद्योगातून उभा राहिलेला विकासाचा चेहरा : प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांचे जोरदार कामे.

  • आजच्या जागतिकीकरणाच्या आणि मुक्त बाजारपेठेच्या युगात संधींची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. पण आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात यश केवळ नशिबाने मिळत नाही, ते मिळते दूरदृष्टी, कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे व्यवसाय आणि प्रगतीसाठी नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. अशा बदलत्या काळात जिद्द, नियोजन आणि सकारात्मक विचारांच्या बळावर उद्योगविश्वात यश संपादन करीत राजकीय क्षेत्रातही प्रभावी पाऊल टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर.यशस्वी उद्योजक, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि आता विकासदृष्टी असलेला राजकीय चेहरा असा बहुआयामी प्रवास प्रणय भांडारकर यांचा आहे.
  • विचारांची ताकद, उद्योगातील यश आणि शेतकऱ्यांशी नाळ : यश हे विचारांपासून सुरू होते” या तत्वावर विश्वास ठेवत १९७६ पासून सुरू असलेली ‘अनुप कृषी सेवा’ आजही शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र आहे. प्रत्यक्षात १९७६ पासून सुरू असलेल्या या कुटुंबीय व्यवसायाला जवळपास पाच दशकांची परंपरा लाभलेली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून, त्यांना योग्य मार्गदर्शन देत आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवत भांडारकर कुटुंबाने जळगाव जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यवसायाकडे केवळ नफ्याचे साधन म्हणून न पाहता समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहण्याची त्यांची भूमिका हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली.जाणीवपूर्वक नियोजन, विश्वासार्हता आणि गुणवत्तेचा आग्रह या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला उद्योग आजही शेतकऱ्यांचा आधारवड आहे.*
  • सामाजिक जाणीव आणि राजकीय वाटचालीचा प्रारंभ :- उद्योगासोबतच सामाजिक कार्यातही मुन्ना भांडारकर सातत्याने सक्रिय राहिले. गरजूंसाठी मदत, युवकांशी संवाद, गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग या माध्यमातून त्यांनी समाजाशी घट्ट नाते जोडले. त्यांच्या साधेपणामुळे आणि निस्वार्थ वृत्तीमुळे त्यांना स्थानिक पातळीवर व्यापक पाठिंबा मिळाला. ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि युवा नेते अमोल शिंदे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका स्विकारली. अलकाताई भांडारकर यांचा राजकीय वारसा लाभल्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक परिपक्व झाले.* टक्केवारी नाही, फक्त विकास :-
  • नगरदेवळा गावाच्या सद्यस्थितीकडे पाहून मुन्ना भांडारकर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विकासकामांमध्ये कोणतीही टक्केवारी स्विकारली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या तत्त्वावर ठाम राहून काम करू.” राजकीय हव्यासासाठी नव्हे, तर गाव आणि जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.* सर्वसमावेशक विकासाची ग्वाही :- ‘
  • सबका साथ, सबका विकास’ या भूमिकेवर विश्वास ठेवत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाचा संकल्प केला आहे. त्यांच्या विकास आराखड्यात दमदार व दर्जेदार रस्ते, नदीवर मजबूत आणि सुरक्षित पूल, शेतीकडे जाणाऱ्या नदी-नाल्यांवरील गुणवत्तापूर्ण फरशी, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, प्रत्येक गावात मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन अशा ठोस कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार आहे.* युवकांच्या आशा-अपेक्षांचा केंद्रबिंदू :- नगरदेवळा, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील युवकांमध्ये मुन्ना भांडारकर यांचे नाव विश्वासाने घेतले जाते. अल्पावधीतच ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि राजकीय हेवेदावे टाळणारा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.*
  • विकासाची नवी दिशा, नेतृत्वाचा नवा चेहरा :- प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांची वाटचाल ही केवळ उद्योग किंवा राजकारणापुरती मर्यादित नाही. ती सकारात्मक विचार, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीवर उभी आहे. यशस्वी उद्योजक ते प्रभावी राजकारणी हा त्यांचा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.नगरदेवळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झालेला हा तरुण चेहरा आता केवळ आश्वासन देत नाही, तर कृतीतून परिवर्तन घडविण्याचा निर्धार करीत आहे. नगरदेवळ्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात मुन्ना भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ? असा विश्वास गावाला वाटत आहे.

नगरदेवळा गावात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.शेतकरी बांधवांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच नदी नाल्याच्या खोऱ्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळाव असं सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याचे अंदाजानुसार जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरदेवळा स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.

  • दि.१४/०३/२०२६ शनिवार रोजी रोजी नगरदेवळा चे रहिवासी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस हवलदार प्रसिद्ध नावाने ओळखले जाणारे विजय मधुकर शिंदे यांचे भासे स्व.ऋषिकेश मधुकर पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांच्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थान पाचोरा, येथे स्व.ऋषी बाबा फाऊंडेशन व सर्व मित्रपरिवार तर्फे एक अल्प भोजनाचा उपक्रम करण्यात आला.महाराष्ट्रात मुलींसाठी अनेक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत असून, त्या वारकरी संप्रदायाचे ज्ञान, कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्मिक शिक्षण देतात.
  • अंदेवळे तील राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि पाचोरा ची श्री ह.भ.प.योगेश महाराज धामणगावकर लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा या प्रमुख आहेत. या संस्थांमध्ये हरिपाठ, ज्ञानेश्वरी, आणि भजन-कीर्तनाचे प्रशिक्षण दिले जाते. लक्ष्मी वारकरी शिक्षण संस्था, पाचोर: ही संस्था मुलींना वारकरी परंपरेचे शिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे.लक्ष्मी माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, पाचोर हे:.
  • श्री ह.भ.प.योगेश महाराज धामणगावकर यांच्या नेतृत्वाखालील ही संस्था मुलींना वारकरी शिक्षण देते.श्री लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा: या संस्थेत वारकरी सांप्रदायिक शिक्षण दिले जाते.लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा: येथे मुलींसाठी विशेष वारकरी शिक्षण उपक्रम राबवले जातात.
  • शिक्षण पद्धती आणि वैशिष्ट्ये:अध्यात्मिक शिक्षण: हरिपाठ, गीता, अभंग, ज्ञानेश्वरी, आणि संत वाङ्मयाचा अभ्यास.कला शिक्षण: कीर्तन, प्रवचन, भजन, मृदंग वादन आणि टाळ वादनाचे प्रशिक्षण.गुरुकुल पद्धती: अनेक संस्थांमध्ये गुरुकुल पद्धतीने (निवासी) शिक्षण दिले जाते.महत्त्वाची टीप: वारकरी शिक्षण संस्था निवडताना संस्थांची विश्वासार्हता आणि सुरक्षेची पडताळणी करणे आवश्यक आहे, कारण आळंदीतील एका खाजगी संस्थेत नुकत्याच अनुचित घटना घडल्याचे समोर आले आहे.

नगरदेवळ्यात रमजानमध्ये रोजेदारांसाठी ‘अभिलाषा रोकडे यांच्या सेवाभावी उपक्रम

  • पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांच्या वतीने उपवास करणाऱ्या रोजेदारांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रमजानचे संपूर्ण 1 दिवस रोजा (उपवास) ठेवणाऱ्या नागरिकांना रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) वेगवेगळ्या आवश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांचा कडून देण्यात आली आहे.
  • या उपक्रमात उपस्थित सलीम शाह, अनिस खाटीक, अदनान रजा, खालील खान, नजीम खाटीक, आदी कार्यकर्त्यांचा पुढाकार असून सामाजिक बांधिलकीतून आणि सेवाभावनेतून हा उपक्रम राबविन्यात आले आहे. रमजान हा संयम, त्याग, दानधर्म आणि बंधुभावाचा महिना असल्याने समाजातील गरजू उपवासकर्त्यांना दिलासा मिळावा, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.इफ्तारसाठी, खरबूज, चिकू,खजूर, पाणी, फळे, आवश्यक खाद्यपदार्थ तसेच गरजेनुसार इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांनाही रोजा सोडतांना अडचण भासणार नाही.
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा नेत्या अभिलाषा भिला रोकडे सांगितले की, हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजात आपुलकी, माणुसकी आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. रमजानच्या निमित्ताने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.या उपक्रमाबद्दल नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे. रमजान महिन्यात गरजू रोजेदारांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

मोठी बातमी समोर येत आहे

महत्वाची सूचना

फैजान शेख:नगरदेवळा परिसरात आझाद नगर येथे lअसलेली फॅशन टेलर यांची दुकानात मनमानी शिलाईच्या रेट वाढण्याच्या काम नगरदेवला संघटना कडून वंचित राहून स्वतःची दुकानावर आपली मनमानी करून रेट वाढण्याच्या प्रकरण समोर आला आहे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी मी त्यांच्या दुकानात माझ्या सावतांच्या ड्रेस घालायला गेलो त्यांनी मला त्यांचे हत्याचारांची चिठ्ठी देऊन त्याच्यावरती पाचशे रुपये असे रक्कम त्यांनी लिहिली होती नुकताच त्याची दखल घेऊन त्यांना मी पाचशे रुपये दिले त्यांनी माझ्यावर शिवाकार करत असताना माझ्याकडून सातशे रुपये असे देखील वसूल केले आहे त्यांच्याकडे कार्य असलेले कारागीर साहू भाऊ यांनी मला सांगितलं तुमच्या मित्रासोबत पण असे यांनी ही वाद केला आहे हे सगळ्याची टक्कल घेऊन आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मी यांच्यावर कारवाई करण्यात पुढे प्रकार घेणार आहे अशी प्रतिक्रिया अखिल समाज यांनी व्यक्त केली आहे

नगरदेवळा प्रतिनिधी , दर्पण मराठी Live न्यूज

नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना कडून सत्कार

नगरदेवळा/ प्रतिनिधी:. हसीबुर शेख ✍️

नगरदेवळा येथील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लोकांना ४,८०० रुपयाची निधी देण्यात आली आहे त्यास प्रसंगी दिव्यांग संघटना कडून आज दिनांक १३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सत्कार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याच देखील नगरदेवळा येथील दिव्यांग संघटना ने सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवका आणि सदस्य यांचे सत्कार केलो

त्यावेळी सरपंच सै.प्रतिशा किरण काटकर, उपसरपंच सै.निशा चंद्रकांत चौधरी ग्राम विकास अधिकारी,शरद शांताराम पाटील,एस के पवार शाळेचे प्राचार्य किरण नीलकंठराव काटकर ,तसेच सदस्य ,ज्योती अरविंदसिंग परदेसी, नूर बेग सुपडू बेग, राजेंद्र बाजीराव महाजन, कल्पना भगवान चौधरी, सुवर्णा पंकज पाटील,महेश पाटील,अरविंदसिंग परदेसी,चंद्रकांत चौधरी,सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शैलेंद्रआबा बिरारी,न्यू एनीटाईम चे प्रतिनिधी जावीद शाहा,ग्रामपंचायतचे कर्मचारी ज्येष्ठ लिपिक प्रकाश परदेशी,संदीप पाटील,जितेंद्र परदेसी, पूनम सुशील परदेशी,फारुक शेख, तसकीन, सय्यद,इतर मान्यवर आणि दिव्यांग संघटनाचे लोक उपस्थित होते


सूत्रसंचालक:. उमर बेग संडु बेग (उर्फ उमर टेलर) यांनी अत्यंत कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक


सै.सरपंच प्रतीक्षा काटकर:. यांनी सांगितले की जे काही योजना असतील आम्ही दिव्यंकासाठी आणणार आणि आमच्याशी जे काही त्यांना लाभ भेटतील आम्ही त्यांना देणार अशी प्रतिक्रिया सरपंच प्रतीक्षा काटकर यांनी व्यक्त केली आहे

ग्राम विकास अधिकारी शरद शांताराम पाटील:. यांनी सांगितले की जे दिव्यांग लोक या योजनेतील वंचित राहिलेले आहेत त्यांना या दहा पंधरा दिवसात असे लोकांना लाभ देण्यात येणार आहे

दिव्यांग संघटनांनी सांगितले की आमच्या हक्क दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत आणि सगळ्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिव्यांग संघटनेने व्यक्त केले आहे

नगरदेवळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी

(प्रतिनिधी/हसीबुर शेख ✍️)नगरदेवळे- दि ३१ जानेवारी २०२६ येथील सुतार लोहार समाज मंडळाच्या वतीने आज सकाळी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त भगवान विश्वकर्मा मंदिरात महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक मिळवलेल्या गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांचा समाज मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रा उमेश काटकर सर व प्रा एस एच जोशी सर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रा आर एच भागवत सर यांचा देखील शाल श्रीफळ देऊन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामशिक्षण समितीचे संचालक आप्पासाहेब जगन्नाथ गबा पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरदार एस के पवार विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री एस पी बावस्कर होते. या प्रसंगी श्री बावस्कर सर यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या विषयी माहिती सांगतांना प्राचीन भारतीय स्थापत्य कलेत विश्वकर्मा यांच्या कारागिरांनी केलेल्या अत्युच्च कला कौशल्याचा परिचय करून दिला.

.प्रा जोशी सर यांनी कला उत्सवातील विद्यार्थ्यांचे अनमोल योगदान याविषयी गौरवोद्गार काढले तर प्रा उमेश काटकर यांनी कला उत्सव स्पर्धेची विस्तृत माहिती देत भविष्यात या विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

+

.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री दीपक रमेश हिरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व सुतार व लोहार समाज बांधव तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व अन्य समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी भगवान विश्वकर्मा यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सर्व समाज बांधव सहभागी झाले होते.