नात्यांची ऊब आणि आठवणींचा सुगंध! नगरदेवळ्यात ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ चा उत्साही जल्लोष

(​नगरदेवळा ) विशेष/प्रतिनिधी):- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- ​लाडशाखीय वाणी समाज, नगरदेवळा यांच्यावतीने आयोजित ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ हा सोहळा नुकताच अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. माहेरवाशिणींसाठी खास आयोजित या कार्यक्रमामुळे नगरदेवळा नगरी आनंदात न्हाऊन निघाली होती. आपल्या माहेरी परतलेल्या लेकींचा उत्साह आणि त्यानिमित्ताने जमलेला समाजाचा परिवार यामुळे हा मेळावा अविस्मरणीय ठरला. ​पारंपरिक मिरवणुकीनेContinue reading “नात्यांची ऊब आणि आठवणींचा सुगंध! नगरदेवळ्यात ‘माहेरवाशीण मेळावा २०२६’ चा उत्साही जल्लोष”

🛑 भडगाव नगरपरिषदेचा ‘ॲक्शन प्लॅन’! पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा ‘महाअभियान’ धडाका सुरू.

(संपादक हसीबुर शेख ✍️):- 📞९३०७५९९९८३ (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):- आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी भडगाव नगरपरिषदेने कंबर कसली आहे. दिनांक २० मे पासून संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने ‘मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई अभियान’ अत्यंत आक्रमकपणे सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे पावसाळ्यात भडगावकरांना दिलासा मिळणार असून नगरपरिषदेच्याContinue reading “🛑 भडगाव नगरपरिषदेचा ‘ॲक्शन प्लॅन’! पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा ‘महाअभियान’ धडाका सुरू.”

नगरदेवळा येथे सोमवारच्या आठवडे बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक अन् वाहनधारक त्रस्त!

नगरदेवळा (विशेष प्रतिनिधी):- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज) :- नगरदेवळा येथील सोमवार, दिनांक १८ मे रोजी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य बाजारपेठ आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) झाल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीमुळे बाजारात आलेले नागरिक, महिला, व्यापारी आणि वाहनधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.अस्ताव्यस्त वाहने आणि अतिक्रमणाचा विळखा नगरदेवळा येथील सोमवारचा आठवडे बाजारContinue reading “नगरदेवळा येथे सोमवारच्या आठवडे बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक अन् वाहनधारक त्रस्त!”

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे नगरदेवळाचे इंद्रनिल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!

संपादक हसीबुर शेख ✍️ :- (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ):- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि गतिमान कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा बुद्रुक येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री.Continue reading “धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानतर्फे नगरदेवळाचे इंद्रनिल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!”

नगरदेवळा विद्यालयाची यशाची परंपरा कायम; उच्च माध्यमिक परीक्षेत उर्दू विभागाचा डंका

(संपादक हसीबुर शेख ✍️): नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज नगरदेवळा ग्राम शिक्षण समिती संचलित, सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) निकालात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेषतः विद्यालयाच्या उर्दू भाषा विभागाने तिन्ही शाखांमध्ये घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.शाखानिहाय निकालाचाContinue reading “नगरदेवळा विद्यालयाची यशाची परंपरा कायम; उच्च माध्यमिक परीक्षेत उर्दू विभागाचा डंका”

नगरदेवळा: शिक्षक धैयसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

संपादक हसीबुर शेख ✍️: नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज ​ नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार हायस्कूलचे आदर्श शिक्षक धैयसिंग प्रतापसिंग राजपूत हे आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करून शेकडो विद्यार्थी घडवणाऱ्याContinue reading “नगरदेवळा: शिक्षक धैयसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न”

पाचोरा तालुक्यात जनगणनेचा अनोखा उपक्रम; तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्वप्रथम नोंदवली आमदार किशोर आप्पा पाटलांची माहिती!

(संपादक हसीबुर शेख ✍️):. नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज पाचोरा तालुक्यात २०२६-२७ च्या जनगणनेच्या पूर्वतयारीला आणि नोंदणीला एका विशेष उपक्रमाने सुरुवात करण्यात आली आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वात पहिली नोंदणी करून तहसीलदार विजय बनसोडे यांनी या मोहिमेचा तालुक्यात शुभारंभ केला. प्रशासकीय तत्परता आणि लोकप्रतिनिधींचा पुढाकार: जनगणना ही देशाच्या आणि राज्याच्याContinue reading “पाचोरा तालुक्यात जनगणनेचा अनोखा उपक्रम; तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्वप्रथम नोंदवली आमदार किशोर आप्पा पाटलांची माहिती!”

पाचोरा पोलिसांचा ‘तळीरामांना’ दणका; उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी✍️): (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):. पाचोरा येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात पाचोरा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी धडक कारवाई करत तब्बल २५ तळीरामांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणीContinue reading “पाचोरा पोलिसांचा ‘तळीरामांना’ दणका; उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात”

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा

(संपादक हसीबुर शेख ✍️): (नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर सर मा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे सर तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. योगेश पाटील सर डॉ. हर्षदा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आज रोजीContinue reading “नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा”

कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कसोदा ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महत्त्वाचे टप्पे आणि सद्यस्थितीकसोदा शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केलीContinue reading “कसोदा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात”